⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | पारोळा | Lumpy Skin : जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण गुरांचे आठवडे बाजार बंद!

Lumpy Skin : जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण गुरांचे आठवडे बाजार बंद!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसा अगोदरच जळगाव जिल्ह्यादौऱ्यावर येऊन गेले होते. जिल्ह्याला प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहे. जिल्ह्यात तब्बल २९ गावात रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने मुक्या प्राण्यांवर म्हणजेच गाय, बैल यांच्यावर आता लंपी स्किन डिसीजज आजाराने हल्ला चढवला असून सर्व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बळीराजाचा जोड दंदा म्हणून पशुपालनाकडे पाहीले जाते. मात्र काही दिवसांपासून लंपी स्किन (Lumpy Skin Disease) आजाराने थैमान घातले असून जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सर्वच ठिकाणच्या गुरांचे बाजार बंद करण्यात आले आहे.

जिल्हातील आठ तालुक्यातील २९ गावात जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) या साथ रोगाचा आजाराचे जनावरे आढळून आल्याने तसेंच या रोगाचा प्रसार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी होणाऱ्या वाहतुकीमुळे जिल्हात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांचेकडील दि ६ सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार पारोळा कृषि उत्पन्न बाजार समिती मुख्य मार्केट यार्डवरील गुरांचा आठवडे बाजार दि.११ पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात येत आहे. तरी शेतकरी बंधूनी आपले गुरे-ढोरे विक्रीस आणू नये असे आव्हान बाजार समितीचे प्रशासक जी.एच.पाटील. सचिव रमेश चौधरी यांनी केले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह