⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

सावदा परिसरात गुरांवर लंपी स्किन : रविवारचा बाजार रद्द

जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । सावदा व परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून गुरांवर लंपी स्किन डिसीज नावाचा विषाणू प्रादुर्भाव आल्याने अनेक गुरे मृत्युमुखी पडत आहे. यात प्रामुख्याने गाई व बैल यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याने पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत.

गुरांच्या अंगावर सुरुवातीला पुरळ उठतात नंतर सूज येऊन अंग खांद्यावर सूज येऊन ताप येतो व आठवडाभरातच गुरे मृत्युमुखी पडतात यामुळे परिसरात शेकडो गाई व बैल मृत्युमुखी पडल्याचे प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने त्यांचे विषयी पशुपालक मालकांमध्ये कमालीची नाराजी आहे.बैल जोडीची किंमत लाखाच्या घरात असल्याने जोडीतील एक बैल दगावल्यास ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

त्यामुळे तातडीने प्रशासनाने आता लक्ष घालून तात्काळ पशु पालकांना औषध उपचार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.दूध उत्पादक असलेल्या पशु पशुपालकांना औषध उपचाराची गरज असताना जिल्हा दूध उत्पादक संघाने देखील आता लक्ष देणे गरजेचे असून गावागावातील सहकारी दूध सहकारी संस्थामार्फत औषध उपचार उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी शेतकरी व पशुपालक करीत आहे.


म्हशी पेक्षा गाईवर लवकर लागण
लंपी हा विषाणू मशी पेक्षा गाईवर व बैलांवर जास्त लागण होत असून काही अँटी डोसेज डॉक्टरांकडून सुचवले जात आहेत त्याचा वापर खाजगी मेडिकल मधून काही पशुपालक धारक करीत आहे. विषाणू व त्याची फैलावण्याची गती लक्षात घेता सावदा येथील सर्वात प्रसिद्ध असा गुरांचा रविवारी भरणार बाजार जिल्हाधिकारी जळगाव यांनी एका आदेशानुसार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विषाणू अधिक फैलाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला.