बातम्याराष्ट्रीयवाणिज्य

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना गिफ्ट; गॅस सिलिंडरच्या दरात कपात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२५ । आजपासून नवीन वर्ष २०२५ ला सुरुवात झालीय. आणि या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आलीय. ती म्हणजे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे.

मागली पाचव्या महिन्यापासून व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. पण सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे.

किती रुपयांनी झाली घट?
खरंतर सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. त्यानुसार आज 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये 14.50 रुपयांची घट झाल्याचं दिसून आले. तर दुसरीकडे मात्र 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मागील आठ महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीचे दर स्थिर आहेत. जळगावात घरगुती गॅसचा दर ८०८ रुपये इतका आहे.

IOCL च्या संकेतस्थळानुसार, राजधानी दिल्लीमध्ये आजपासून व्यावसियाक सिलिंडर 1804 रुपयांना मिळणार आहे, याआधी 1818.50 रुपयांना मिळत होता. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये १७५६ रूपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. कोलकातामध्ये १ जानेवारीपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १९११ रुपये झाली. कोलकात्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १६ रुपयांनी कमी झाली. मुंबईतील सिलिंडरची किंमत १५ रुपयांनी कमी झाली आहे. डिसेंबरमध्ये १७७१ रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आजपासून १७५६ रुपयांना मिळेल. चेन्नईमध्ये १९ किलोचा सिलेंडर १९६६ रूपयांना मिळेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button