---Advertisement---
जळगाव शहर गुन्हे

‘लव्ह जिहाद’चा संशय : हॉटेलमध्ये गोंधळ, तरुणाला बेदम मारहाण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरातील मोहाडी नाक्याजवळ असलेल्या हॉटेल गोल्डन नेस्टमध्ये गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास लव्ह जिहादच्या संशयावरून मोठा गोंधळ उडाला. तरुण-तरुणींची पार्टी सुरू असताना संशयावरून एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जमावाला पांगविले.

love jihad doubtful case jalgaon hotel

जळगाव शहरातील मोहाडी नाक्याजवळ डी मार्ट शेजारी हॉटेल गोल्डन नेस्ट आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हॉटेलमध्ये काही तरुण-तरुणींच्या वाढदिवसानिमित्त पार्टी सुरू होती. पार्टीत असलेल्या तरुण-तरुणींना पाहून त्या ठिकाणी असलेल्या एका महिलेला सदर प्रकार लव्ह जिहादचा जाणवला. प्रकाराची माहिती मिळताच तरुणांचा एक मोठा घोळका घटनास्थळी जमला आणि त्यांनी तरुणाला मेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली.

---Advertisement---

पोलिसांनी घटनास्थळावरून जमावाला पांगवले तर जखमी तरुणाला उपचारार्थ रुग्णालयात रवाना केले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह डीबी पथक हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीत कैद झालेल्या मारहाण करणाऱ्या सर्व तरुणांना तात्काळ ताब्यात देण्याचे आदेश चिंथा यांनी दिले आहे. दरम्यान, सर्व प्रकार एका राजकीय पक्षाशी संबंधित महिलेच्या गैरसमजुतीतून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---