प्रवाशांच्या जागेचा प्रश्न सुटणार ! भुसावळ मार्गे धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या कालावधीत वाढ

ऑगस्ट 2, 2025 8:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२५ । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस धनबाद दरम्यान धावणाऱ्या विशेष साप्ताहिक गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, एकूण १८ अतिरिक्त फेऱ्या धावणार आहेत. विशेष या गाडीला भुसावळला थांबा आहे. यामुळे प्रवाशांना या गाड्यांचा लाभ मिळणार आहे. प्रवाशांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

train

गाडी ०३३८० लोकमान्य टिळक टर्मिनस – धनबाद साप्ताहिक विशेष गाडी, जी पूर्वी ३१ जुलै २०२५ पर्यंतच चालविण्यात येणार होती, ती आता ७ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर या कालावधीत चालविण्यात येणार असून एकूण ९ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गाडी ०३३७९ धनबाद -लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी ही पूर्वी २९ जुलै पर्यंत चालविली जाणार होती, ती आता ५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत चालविण्यात येणार असून ९ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे.

Advertisements

या गाडीला २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबे, २ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, ६ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी डबे, ६ शयनयान (स्लीपर) डबे, ४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे, २ जनरेटर कार असे डबे असतील, यागाडीचे आरक्षण ४ ऑगस्टपासून सुरू होत आहे, प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now