⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Breaking : अखेर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, देशात सात टप्प्यात मतदान होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२४ । देशातील लोकसभा २०२४ निवडणुकीचा बिगुल वाजला असून आज शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार आज १६ मार्चपासून देशातील आचारसंहिता लागू झाल्या आहेत. एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार असून २० मे रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका पार पडतील. महाराष्ट्रात एकूण 5 टप्यात निवडणुका होणार आहे.

सात टप्प्यात होणार निवडणुका :
देशभरात लोकसभा निवडणूक एकूण 7 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रिलला होईल. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक २६ एप्रिलल होईल. तिसऱ्या टप्प्यात ७ मेला निवडणूक, चौथ्या टप्प्यातील निवडणूक १३ मे ला पार पडेल. पाचव्या टप्प्यातील निवडणूक २० मेला, सहाव्या टप्प्यातील निवडणूक २५ मे तर सातव्या टप्प्यातील निवडणूक १ जून रोजी होतील

तर ४ जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होईल. दरम्यान, महाराष्ट्रात ४८ लोकसभेच्या जागा असून यासाठी ५ टप्प्यात निवडणूक पार पडतील.