---Advertisement---
जळगाव शहर

एल.के.फाऊंडेशनचे रावण दहन रद्द, मेहरूण तलावावर शुकशुकाट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । शहरात मेहरूण तलावाच्या किनाऱ्यावर दरवर्षी एल.के.फाऊंडेशनच्या माध्यमातून साजरा केला जाणारा रावण दहन उत्सव यावर्षी कोरोनाच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी मोठी गजबज असलेल्या मेहरूण तलावावर यंदा शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे.

ravan dahan

जळगाव शहरातील सर्वात भव्य रावण दहन महोत्सव मेहरूण तलावाच्या किनाऱ्यावर साजरा करण्यात येतो. सुरुवातीला जळगाव मनपाच्या माध्यमातून साजरा होणारा हा उत्सव गेल्या काही वर्षांपासून एल.के.फाऊंडेशनतर्फे साजरा केला जात आहे. कोरोनाचे सावट असल्याने गेल्या वर्षी एल.के.फाऊंडेशनतर्फे एका खाजगी शाळेच्या पटांगणावर रावण दहन साजरा करण्यात येऊन त्याचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले होते. कोरोनाचे सावट यंदा कमी झाले असले तरी प्रशासनाने निर्बंध लागू केले असल्याने एल.के.फाऊंडेशनने रावण दहन रद्द केले आहे. दरवर्षी मेहरूण तलावावर दुपारपासून दिसणारा जनसागर यावर्षी पाहण्यास मिळाला नसून दुपारी तलावावर शुकशुकाट होता.

---Advertisement---

पुढील वर्षी जल्लोषात उत्सव साजरा करणार : ललित कोल्हे

जळगाव शहरवासियांसाठी आणि आपले उत्सव साजरे व्हावे यासाठी दरवर्षी एल.के.फाऊंडेशनमार्फत मेहरूण तलाव काठावर रावण दहन केला जातो. यावर्षी देखील आम्ही एल.के.फाऊंडेशनकडून प्रशासनाला पत्र दिले होते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमातच उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. रावण दहन कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात नागरिकांना रोखणे शक्य होत नाही. गर्दीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्याने यंदाचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. पुढील वर्षी कोरोनारुपी रावणाचा विनाश होईल आणि आम्ही पुढील वर्षी जल्लोषात रावण दहन करू अशी प्रभू श्रीरामचंद्रांना प्रार्थना असून नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन एल.के.फाऊंडेशनचे प्रमुख नगरसेवक ललित कोल्हे यांनी केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---