⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | ऑगस्टमधील बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर ; शाखेत जाण्यापूर्वी तपासा संपूर्ण यादी

ऑगस्टमधील बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर ; शाखेत जाण्यापूर्वी तपासा संपूर्ण यादी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । ऑगस्ट महिना सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. जर तुम्ही ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करणार असाल तर आधी ही बातमी नक्की वाचा. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ऑगस्ट 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार ऑगस्टमध्ये एकूण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत.

आरबीआयने सुट्ट्यांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे
विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक हॉलिडे लिस्ट तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. (ऑगस्ट 2022 मध्ये बँक सुट्ट्या) यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ खाती यांचा समावेश आहे. म्हणजेच, राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, काही राज्य-विशिष्ट सुट्ट्या आहेत, ज्यात सर्व रविवार तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश होतो. चला जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत.

ऑगस्टमध्ये बँक सुट्ट्या
1 ऑगस्ट 2022: गंगटोकमध्ये द्रुपका शे-जी उत्सवामुळे सर्व बँका बंद राहतील.
7 ऑगस्ट 2022: रविवारी वीकेंडमुळे देशभरात बँकांना सुट्टी असेल.
8 ऑगस्ट 2022: जम्मू आणि श्रीनगरमध्ये मोहरम (आशुरा) निमित्त बँका बंद राहतील.
9 ऑगस्ट 2022: चंदीगड, डेहराडून, भुवनेश्वर, गुवाहाटी, इंफाळ, जम्मू, पणजी, शिलाँग, शिमला, तिरुवनंतपुरम आणि श्रीनगर वगळता मोहरम (आशुरा) निमित्त बँका बंद राहतील.
11 ऑगस्ट 2022: रक्षाबंधनानिमित्त देशभरात बँकांना सुट्टी असेल.
13 ऑगस्ट 2022: महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहतील.
14 ऑगस्ट 2022: रविवारी वीकेंडमुळे देशभरात बँकांना सुट्टी असेल.
15 ऑगस्ट 2022: स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील सर्व बँका बंद राहतील.
16 ऑगस्ट 2022: पारशी नववर्षानिमित्त मुंबई आणि नागपूरमधील सर्व बँका बंद राहतील.
18 ऑगस्ट 2022: जन्माष्टमीनिमित्त देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
21 ऑगस्ट 2022: रविवारी वीकेंडमुळे देशभरात बँकांना सुट्टी असेल.
28 ऑगस्ट 2022 – रविवार हा वीकेंडमुळे देशभरात बँकेला सुट्टी असेल.
31 ऑगस्ट 2022: गणेश चतुर्थीनिमित्त गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँकांना सुट्टी असेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.