मद्यप्रेमींनो लक्ष द्या! उद्या जळगाव जिल्ह्यातील दारू दुकाने राहणार बंद; कारण घ्या जाणून

जुलै 13, 2025 12:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२५ । मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. उद्या म्हणजेच १४ जुलै सोमवारी जळगाव जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने बंद राहणार आहे. यामागचे कारण म्हणजे शासनाने मद्यावरील कर २५ वाढवल्याने व्यवसायात टक्क्यांची घट होऊ शकते. या विरोधात जिल्ह्यातील मद्य व्यावसायिक, बारचालकांनी उद्या १४ जुलै रोजी मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या दिवशी सर्व मद्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात शनिवारी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.

daru

जळगाव जिल्हा परमिट रूम वाइन असोसिएशनचे अध्यक्ष ललित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात २० हजारांच्यावर बार आहे. त्यापासून हजारो कोटी रुपयांचा महसूल महाराष्ट्राला मिळतो. सहा लाख प्रत्यक्ष रोजगार व पाच लाख अप्रत्यक्ष रोजगार यातून मिळतो. त्यातच आता संकट म्हणून यावर्षी पंधरा टक्के फी वाढ झाली. आता मद्यावरील करात ६० टक्के वाढ करण्यात आली आहे. परिणामी मद्य व्यवसाय धारकांचा सेल २५ टक्के घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील बार चालकांनी व सर्व मद्य व्यावसायिकांनी सोमवारी व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. व्हॅट वाढवल्याने सरकारचे उत्पन्न कमीच झाले आणि बेकायदेशीर धंदे वाढले. तसेच परराज्यातून अनधिकृतरीत्या अवैध दारू येणे सुरू झाले आहे. व्हॅटमुळे किती बार बंद पडले?, किती तरी लोक बेरोजगार झाले?, उत्पन्नात किती भर पडली? याचा सरकारने अभ्यास करावा व तो पर्यंत व्हॅट टॅक्सवर स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी १४ जुलै रोजी कोर्ट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयात मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now