जळगाव लाईव्ह न्यूज । जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथील श्री माता वैष्णो देवीच्या त्रिकुटा पर्वतावर वीज कोसळल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये अचानक हवामान बदलले आणि त्यानंतर तिथे मुसळधार पाऊस पडला. अशा परिस्थितीत कटरा येथेही मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, त्रिकुट पर्वताच्या आल्हाददायक हवामानाचा व्हिडिओ एक व्यक्ती बनवत असताना त्रिकुट पर्वतावर वीज कोसळली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली.हे दृश्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून, त्याचे अनोखे आकर्षण सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे.
कटरा जे कि त्रिकुटा पर्वताचा एक प्रमुख प्रवेशद्वार आहे. हे स्थळ धार्मिकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. येथूनच तीर्थयात्रेचा प्रारंभ होते, जिथे हजारो भक्त दरवर्षी देवी वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येतात. अशातच अचानक वादळाचे आगमन झाले. वादळात गडगडाट, कडकडाट आणि विजेचा प्रहार यातून एक नवा अध्याय सुरू झाला.