जळगाव जिल्ह्यात कृषी विभागाची धडक कारवाई; २ खत विक्रेत्यांचे परवाने कायमचे रद्द, १० निलंबित

मार्च 25, 2026 10:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात खत विक्रीतील अनियमितता आणि जास्त दराने विक्रीच्या तक्रारींवरून कृषी विभागाने मोठी कारवाई करत २ विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहे. त्यासोबत कासोदा (एरंडोल) येथील सोसायटीसह अन्य १० व्यावसायिकांचे परवाने निलंबित केले आहेत, तर एका परवानाधारकाला ताकीद दिली आहे.

dap fertilizer rate

अचानक तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी खताचा साठा नोंदीत नसणे, दरपत्रक न लावणे आणि शेतकऱ्यांना योग्य माहिती न देणे अशा त्रुटी आढळून आल्या.या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली

युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभाग व गुणवत्ता नियंत्रण पथकाने जळगाव जिल्ह्याच्या कासोदा (ता. एरंडोल) येथे धाड टाकून सहा दुकानांत तब्बल ३४१८ गोण्यांचा युरिया साठा जप्त केला. शेतकऱ्यांना युरिया शिल्लक नाही, असे सांगत जास्त दराने विक्री करून लूट केल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले होते.

नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी कोणतीही गैरव्यवहाराची घटना आढळल्यास तत्काळ कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी युरिया व इतर खते खरेदी करताना आधार कार्ड सोबत न्यावे. आधार लिंक करूनच खरेदी करावी. किती व कोणती खते विक्री झाली, याची खात्री करावी. परवानाधारकांनीही रब्बी हंगाम संपत आला असला तरी खतांसह अन्य साठ्याची विक्री नियमानेच करावी. अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now