⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | विज्ञानाची कास धरू या, कवेत अवकाश घेऊ या : डॉ. रतकल्ले

विज्ञानाची कास धरू या, कवेत अवकाश घेऊ या : डॉ. रतकल्ले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । विज्ञान दिनानिमित्त प्रगती विद्यालय रोझोदा येथे डॉ.सी.व्ही.रामण यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे शिक्षक विजय सुरवाडे हे होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ.एस.आर.रतकल्ले यांनी मानवाच्या प्रगतीसाठी विज्ञान हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, म्हणून विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, असे मत व्यक्त केले. तर डॉ.एन. एन.लांडगे यांनी विज्ञानातील रहस्य सांगितले. दिपाली तायडे, प्रशांत तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी समूहगीत गायन केले. प्रस्तुत कार्यक्रमास विद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रम बी.एड.छत्राअध्यापक यांनी आयोजित केला. संतोष पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार सारिका पाटील यांनी केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह