⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

‘अल-निनो’मुळे थंडीचा कडाका झाला बेपत्ता, जळगावात आगामी दिवसात तापमान वाढणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । 21 जानेवारी 2024 । जळगावात यंदाच्या हिवाळ्यात म्हणावी तशी थंडी जाणवली नाही. यामागील कारण अल-निनो आहे. ‘अल-निनो’ (El-Nino)च्या प्रभावामुळे २०२३ मध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले. थंडीदेखील कमी राहिली. अल-निनोमुळे थंडीचा कडाका बेपत्ता झाला. या हिवाळ्यात मोजून तीन ते चार दिवस जळगाव जिल्ह्याचे तापमान १० अंशाखाली गेले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. आता फेब्रुवारीपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील तापमानात चढउतार पाहायला मिळत आहे. मधील काळात ढगाळ वातावरणामुळे थंडीच्या प्रमाणात काहीशी घट झाली होती. मात्र गेल्या तीन चार दिवसात पहाटचे तापमान १० अंशावर आल्याने थंडी जाणवत आहे. मात्र आगामी दिवसात तापमानात वाढ होईल. आगामी काही दिवसात कमाल तापमान १३ ते १४ अंशा तर किमान तापमान ३० ते ३५ अंशावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

अलनिनो’चा इफेक्ट
२०२३ मध्ये अलनिनो’चे अनेक इफेक्ट पहावयास मिळाले. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे कडक उन्हाळा, पावसाळा लांबणार असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळेच २०२३ च्या एप्रिलमध्ये पाऊस पडला होता. मे महिना कडाक्याचा होता. तसेच पावसाळा जूनच्या शेवटी सूरू झाला. जुलैत चांगला पाऊस बरसला मात्र पुन्हा ऑगस्ट मध्ये महिनाभराची ओढ पावसाने दिली.

ऑगस्टच्या शेवटी सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला.यामुळे खरिपाच्या पिके साठ टक्के वाचली होती. परतीचा मॉन्सून केव्हा गायब झाला याचा अंदाजही आला नाही पावसाच्या लहरीपणामुळे खरिपात उडीद, मुगाबरोबरच कापसाचे नुकसान झाले.रब्बी हंगामात थंडीच्या कडाका अधिक असतो. यामुळे शेवटचा पाऊस दमदार झाला नाही आणी थंडीचा कडाका दीड-दोन महिने राहिला तर रब्बीतील गहु, हरभरा, ज्वारी, दादर ही पिके यावर येत होती. यंदा मात्र नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या तीन महिन्यात केवळ तीन चार दिवस तापमान १० अंशावर खाली होते.