जळगाव जिल्हाजळगाव शहर

विधिमंडळ आमदार समितीची अंजनी धरण व पद्मालयला भेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । एरंडोल विधिमंडळ आमदार समितीने बुधवारी २५ रोजी अंजनी धरनाला व श्रीक्षेत्र पद्मालय येथे भेट देऊन माहिती घेतली. अंजनी धरणावर या समितीने वितरण प्रणालीची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अश्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या

धरणाच्या कामांना कधी मंजुरी मिळाली व काम केव्हा पूर्ण झाले पाणी साठा किती आहे बुडीत क्षेत्रातील गावे कोणती त्यांचे पुनर्वसन झाले का अशी तांत्रिकमाहिती या समितीने घेतली.यावेळी अधीक्षक अभियंता प्रशांत मोरे, कार्यकारी अभियंता ए जी कुलकर्णी, अंजनी प्रकल्पाचे सायकल अभियंता सी आर बनसोड व इतर अधिकारी उपस्थित होते.

पद्मालय येथे या समितीतील आमदारांनी गणपतीचे मंदिर बंद असल्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतले यावेळी वनखात्याच्या विश्रामगृहाच्या आवारात समितीचे अध्यक्ष आमदार रणजित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन वन पर्यटनाबाबत चर्चा झाली. पद्मालय देवस्थान ला ब वर्ग दर्जा मिळावा अशी मागणी विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली सदर प्रस्ताव तीन वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. पद्मालय परिसराचा पर्यटन म्हणून विकास करण्याबाबत सविस्तर चर्चा समितीतील सदस्यांनी केली. आमदार चिमणराव पाटील यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला.

यावेळी स्वस्त आनंदराव पाटील, अमित पाटील, भाऊसाहेब कोळी, भिका पाटील, राजेश तिवारी, तहसीलदार सुचेता चव्हाण, पोलीस अधिकारी वनखात्याचे अधिकारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी पद्मालय बंधाऱ्याची नदीतील आमदारांनी पाहणी केली

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button