जळगाव लाईव्ह न्यूज २० नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आज एकाच टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात सकाळी ७ ते ११ पर्यंत १५.६२ टक्के मतदान झालं आहे.
अनेक मतदान केंद्रात तर सकाळपासूनच रांगाच रांगा लागल्या आहेत. मतदार मोठ्या संख्येने मतदानाला उतरल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर, आज संध्याकाळी उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार असून येत्या २३ तारखेला त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
जिल्ह्यातील तालुकासंघनिहाय टक्केवारी
अमळनेर -१४ %
भुसावळ -१६.४२ %
चाळीसगाव -१७.९० %
चोपडा -१४.९० %
एरंडोल- १४.३९ %
जळगाव सिटी- १५.८८ %
जळगाव ग्रामीण -१७.८३%
जामनेर -१५.१३ %
मुक्ताईनगर- १६.१७ %
पाचोरा -८.५३ %
रावेर – २०.५० %