जळगावातील अजित पवार गटाच्या नेत्याला अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

सप्टेंबर 24, 2025 3:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२५ । जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी एक बातमी आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते विनोद देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. एका व्यवसायिकाच्या कार्यालयावर दरोडा टाकून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. आता यानंतर मंगळवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली

ajit pawar

नेमकं प्रकरण काय?

व्यावसायिक मनोज लिलाधर वाणी यांच्या तक्रारीनुसार, जळगाव शहरातील त्यांच्या कार्यालयावर ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी अचानक हल्ला करून दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी संशयितांकडून वाणी यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. या आरोपांच्या आधारे १२ नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विनोद देशमुख यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. मात्र, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही देशमुख यांना अटक करण्याची कार्यवाही पूर्ण झाली नव्हती. यामुळे पीडित व्यावसायिक नाराज होते.

याबाबत काही दिवसांपूर्वीच मनोज वाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर गंभीर आरोप केला होता. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावामुळे पोलीस आरोपींना अटक करत नाहीत,” असा आरोप त्यांनी जाहीरपणे केला होता. तसेच आठवडाभरात न्याय न मिळाल्यास मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोर मुं

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now