जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । सावदा येथून न.पा.हद्दीतून जाणार आमोदा भिकनगाव हायब्रीड वे हायवेस लोकनेते स्व. हरीभाऊ जावळे यांचे नाव देण्याचा ठराव सावदा पालिकेने पूर्वीच मंजूर केला. रामनवमीच्या मुहूर्तावर महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज, शास्त्री भक्तीकिशोरदासजी, व महंत सुरेशराजशास्त्री मानेकर बाबा यांचे हस्ते सदर रस्त्याचे नियोजीत स्व. हरीभाऊ जावळे मार्ग असे फलक अनावरण तसेच भगवान श्रीराम यांचे प्रतीमा पूजन करण्यात करण्यात आले.
यावेळी सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलतांना जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले की पालिकेने ठराव केला सर्व पक्षीय लोक उपस्थित आहे म्हणून आम्ही या कार्यक्रमास उपस्थित राहिलो, या रस्त्याचे नावास सदर स्व. हरीभाऊ जावळे याचे नाव देण्यात काही तांत्रीक अडचणी असतील तर त्या देखील लवकर सोडवाव्या असे देखील प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी स्व. हरीभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे, माजी जी.प. उपाध्यक्ष नंदूभाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, राजेंद्र, चौधरी, भरत महाजन, यावल येथील शिवसेनेचे मुन्नाभाऊ पाटील, डॉ. कुंदन फेगडे, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, सावदा येथील मा. नगरसेवक फिरोजखान हबीबुल्ला खान पठाण, अरुण चौधरी, रावेर येथील सुरेश धनके, अरुण चौधरी, पिंटू राणे, मा. नगरसेविका लीना चौधरी, रंजना भारंबे, बेटी बचाव च्या सारिका चव्हाण, रेखा बोंडे, श्रीकांत महाजन, ललित बोंडे, डॉ विजय धांडे, हिरालाल पाटील सूरज परदेशी यांचे सह सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते