जळगाव जिल्हा
स्व. हरिभाऊ जावळे यांची जयंती भाजपा कार्यालयात साजरी
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांची जयंती रविवार दि.३ रोजी भाजपा कार्यालय वसंतस्मृति येथे साजरी करण्यात आली.
स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते माल्यार्पण व पुष्पअर्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश निधी संकलन प्रमुख संतोष केलकर, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष शौचे, अजय जोशी, जिल्हा पदाधिकारी प्रकाश पंडित, गणेश माळी आदी उपस्थित होते.