⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 4, 2024
Home | जळगाव जिल्हा | ‘त्या’ तरुणामुळे भुसावळ-सुरत दरम्यानची रेल्वे सेवा झाली विस्कळीत, नेमकं काय घडलं?

‘त्या’ तरुणामुळे भुसावळ-सुरत दरम्यानची रेल्वे सेवा झाली विस्कळीत, नेमकं काय घडलं?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२३ । तांत्रिक कामे हाताळण्यासाठी रेल्वेकडून अनेकवेळा मेगा ब्लॉक घेतला जातो. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्यासोबतच प्रवाशांची गैरसोय होते. परंतु अशातच मध्य रेल्वेच्या नंदुबार रेल्वे स्थानकावर एक वेगळीच घटना घडली आहे. एका तरुणांमुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली.

त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या नंदुरबार रेल्वे स्टेशनवरच थांबवून ठेवल्या होत्या. त्यामुळं शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला. तो तरुण मनोरुग्ण होता. आणि तो रेल्वेच्या हाय टेन्शन लाईनवर चढल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करावा लागला आणि रेल्वे जागेवरच थांबल्या.

नेमका प्रकार काय?
आज मंगळवारी एक मनोरुग्ण तरुण रेल्वेच्या हाय टेन्शन लाईनवर चढल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. यांनतर भुसावळ ते सुरत दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद झाली. परिणामी सर्व रेल्वे जागेवरच थांबल्या. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. मनोरुग्णाला हाय टेन्शन लाईनवरून खाली उतरवण्याचे प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु तो मनोरुग्ण ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडत होती.

अखेर एक तासांच्या प्रयत्नानंतर त्याला खाली उतरवण्यात यश आले. त्यानंतर रेल्वेचा वीज पुरवठा पुन्हा सुरु झाला आणि जागेवर थांबलेल्या रेल्वे पुन्हा धावू लागला. परंतु तासभर रेल्वे बंद झाल्यामुळे प्रवाशी अडकून पडले होते. अनेक प्रवाशांचे पुढील नियोजन कोलमळले आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. त्या मनोरुग्ण व्यक्तीस रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.