‘वीर जवान अमर रहे’..च्या घोषणा देत, शहीद स्वप्नील सोनावणेंना अखेरचा सलाम

ऑगस्ट 12, 2025 6:09 PM

भडगाव तालुक्यातील गुढे गाव शोकाकुल

jawan swapnil sonavane

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२५ । भडगाव तालुक्यातील गुढे येथील सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (जी.डी.) स्वप्निल सुभाष सोनवणे यांचा कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. यांनतर आज मंगळवारी त्यांच्या मूळ गावी सैनिकी सन्मानाने जवान स्वप्निल सोनवणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. “वीर जवान अमर रहे” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गावातील नागरिक, नातेवाईक, मान्यवर व माजी सैनिकांनी अश्रूंच्या धारा वाहत आपल्या वीर पुत्राला अखेरचा निरोप दिला.

Advertisements

९ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीओपी ढोलागुरी येथे सीमा फ्लड लाईट खांब दुरुस्त करताना विजेचा धक्का बसून जवान सोनवणे गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Advertisements

आज सकाळी 10 वाजता पार्थिवावर पूर्ण सैनिकी सन्मानाने अंतिम विधी पार पडले. यावेळी तहसीलदार शितल सोलाट, पोलीस उपनिरीक्षक सुधीर सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, 57 बटालियन बीएसएफचे इन्स्पेक्टर कमल किशोर व सलामी पथक, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, वैशाली सूर्यवंशी, सुमित दादा पाटील, माजी सभापती विकास तात्या पाटील, शेतकी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, माजी जि.प. सदस्य संजय श्रावण पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख समाधान भाऊ पाटील, युवा नेते हर्षल पाटील, शिवदास पाटील, माझ्या सैनिक फेडरेशन भडगाव अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष, सचिव व माजी सैनिक बापू पाटील, गुढे गावच्या सरपंच कल्पनाताई उत्तमराव महाजन, पोलीस पाटील मिलिंद मोहन मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जवान सोनवणे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, त्यांचे कर्तृत्व व शौर्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now