जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । चोपड्याकडे जाणाऱ्या टॅक्सीच्या टपावरून महिलेची बॅग चोरट्याने लांबविल्याची घटना १३ रोजी सकाळी ११.३० वाजता टॅक्सी स्टॅण्डवर घडली. बॅगेत सुमारे दीड लाखांचे सोन्याचे दागिने होते. या प्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. प्रदीप चिंतामण पाटील (रा.आर.के.नगर) यांनी फिर्याद दिली. त्यांची मुलगी आणि जावई हे मामलदे (ता.चोपडा) येथे जाण्यासाठी, टॅक्सीत (क्र.एम.एच.१९-वाय.६३०) मध्ये बसले. त्यांनी आपली बॅग टॅक्सीच्या टपावर ठेवली होती. ही बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे तपास करत आहेत. प्रवासात शक्यतो मौल्यवान वस्तू, दागिने आणि जास्तीची रोकड नागरिकांनी सोबत नेऊ नये, आपले सामान नजरेसमोर ठेवावे, अनोळखी व्यक्तीकडून खाद्यपदार्थ घेऊ नये, खबरदारी घ्यावी, असे आवाहन अमळनेर पोलिसांनी केले आहे.
हे देखील वाचा :
- मामाकडे राहणाऱ्या तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना
- Jalgaon : तरुणाच्या खात्यातून एक लाख गायब; सायबर ठगांनी अशी केली फसवणूक?
- भुसावळ शहर हादरले! पूर्व वैमनस्यातून गोळ्या झाडून तरुणाची हत्या..
- दुचाकीसह दुकान फोडून मुद्देमाल लांबविणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- जळगावचा सराईत गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध