जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२५ । राज्य सरकारकडून राबविल्या जात असलेल्या लाडकी बहीण योजनेमार्फत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत आहे. आतापर्यंत या योजनेचे एप्रिलपर्यंतचे 10 हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता आकरावा मे महिन्याचा हप्त्या कधी मिळेल? याच्या प्रतिक्षेत लाडक्या बहिणींनी आहेत. अशातच मेच्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट समोर आलीय. पुढील दोन आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहिण योजनेचे आतापर्यंतचे बहुतांश हप्ते हे महिन्याच्या 25 ते 30 तारखेपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. फक्त एप्रिल महिन्यातील 10वा हप्ता दोन दिवस उशीरा म्हणजे 2 मे रोजी जमा झाला होता. आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत लाभार्थ्यी महिलांमध्ये उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याचा हप्ता या महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. आज 16 मे असून पुढील 14 दिवसांत म्हणजेच 30 मेपर्यंत 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतो. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्याप हप्त्याच्या नेमक्या तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही.
लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार
लाडकी बहीण योजनेच्या खात्यांचा आणि कागदपत्रांचा वापर सायबर आणि हवाला गुन्ह्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला. जुहू पोलिसांनी या प्रकरणी एका टोळीचं पितळ उघडं पाडलं आहे. यानंतर सराकरने लाडकी बहीण योजनेच्या खात्यांची पडताळणी युद्धपातळीवर करण्याचे आदेश सर्व जिल्हा महिला विकास विभागांना देण्यात आले आहेत.