जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात असून आता यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा केली आहे. बहिणींना व्यवसाय उभारणीसाठी ४० हजारांपर्यंत कर्ज देण्याचा विचार केला जात असल्याचं अजित पवार यांनी आयोजित नांदेमधील कार्यक्रमात सांगितलं

अजित पवार यांनी सांगितलं की, लाडक्या बहिणींना मला सांगायचं आहे की कधीकधी आमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये देतो. ज्या लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी योजना कधीच बंद होणार नाही. या योजनेतून महिलांना मदत होते. आम्ही आणखी एक प्रस्ताव आणलेला आहे. यासंदर्भात बँकांशी बोलणं सुरु आहे.
काही जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या आहेत. १५०० रुपये महिलांना दिले जातात. त्याऐवजी ३० ते ४० हजार रुपये महिलांना द्यायचे आणि त्याचे हप्ते लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कापले जाईल. जर महिलांना भांडवल मिळालं तर त्या व्यवसाय सुरु करु शकतात. यातून तिचं कुटुंब ती उभं करु शकेल. महाराष्ट्रातील काही बहिणींनी हे केलं आहे. तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा. आम्ही हा कार्यक्रम देणार आहे. त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे, असं अजित पवारांनी सांगितलं.