⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

‘या’ मुलीच्या अनोख्या लग्नाची अख्या देशात होतेय चर्चा, वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२२ । बरेच लोक त्यांच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक असतात, यासाठी ते खूप आधीपासून तयारी करतात. पण गुजरातमधून एका विचित्र लग्नाचे प्रकरण समोर आले आहे. एक २४ वर्षांची तरुणी स्वतःसोबतच लग्नाची गाठ बांधणार आहे. इतकंच नव्हेतर, लग्नानंतर ती हनीमूनसाठीही जाणार आहे. दरम्यान, या अनोख्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरूय. क्षमा बिंदू असे या तरुणीचे नाव आहे.

गुजरातमधील वडोदरा येथे राहणारी २४ वर्षीय क्षमा बिंदूही तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असून 11 जून रोजी तिचे लग्न आहे. तिने लेहेंग्यापासून पार्लर, ज्वेलरी, फोटोग्राफरपर्यंत सर्व काही बुक केले आहे. पण खास गोष्ट म्हणजे तिच्याशी लग्न करण्यासाठी कोणीही वर नसेल. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की वर नसलेले लग्न कसे? खरतर क्षमाने सोलो वेडिंग म्हणजेच स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे सर्व रितीरिवाजांनी लग्न करणार आहेत. ती सिंदूरही लावेल, कन्यादान करणे असे सगळेच पारंपारिक विधी क्षमाच्या लग्नात होणार आहे. पण लग्नात वरात किंवा मिरवणूकही असणार नाही. बहुधा गुजरातमध्ये हा पहिलाच एकल विवाह आहे. त्यामुळं सध्या देशभरात याची चर्चा आहे.

TOI शी केलेल्या संभाषणात क्षमाने सांगितले की, मला कधीच लग्न करायचं नव्हतं पण मला नवरी व्हायचं होतं. म्हणूनच मी स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. देशात याआधी कोणी सोलो वेडिंग केलं आहे हे शोधण्याचाही मी प्रयत्न केला. मात्र, मला तेव्हा कोणीही सापडले नाही. मला वाटतं देशात स्वतःशीच लग्न करणारी मी पहिली मुलगी आहे. देशात स्वप्रेम हे उदाहरण देणारी मी पहिलीच मुलगी असेन, असं क्षमा म्हणते.

लग्नानंतर हनिमूनला जाणार
लग्नानंतर क्षमाही हनिमूनला जाणार आहे. ती दोन आठवड्यांसाठी गोव्याला हनिमूनला जाणार आहे. क्षमाने सांगितले की, जेव्हा तिने स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय तिच्या पालकांना सांगितला तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले. मात्र समजूत काढल्यानंतर त्यांनी परवानगी दिली. या लग्नासाठी त्याच्या आई-वडिलांनीही तिला आशीर्वाद दिले आहेत.