जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२१ ।शहर मनपाकडून ठिकठिकाणी लसीकरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. भारतात तयार झालेली लस पूर्णतः सुरक्षित असून नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता लस टोचून घ्यावी, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे. महापौरांनी शनिवारी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला.
महापौर जयश्री महाजन यांनी नानीबाई अग्रवाल मनपा रुग्णालयात कोविड लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी डॉ.शिरीष ठुसे, परिचारिका शिवानी परदेशी, शीतल गर्गे, शोभा पोकदे आदी उपस्थित होते. जळगाव शहर मनपाने लसीकरण दोन ठिकाणी सुरू केले आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखणे आपलीच जबाबदारी आहे. मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या मी जबाबदार या अभियानाअंतर्गत नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, शासनाने सुचविलेल्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे.