गुरूवार, जून 8, 2023

लाच भोवली ; खिरोदा येथे तलाठीसह कोतवाल रंगेहात जाळ्यात अडकला

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२३ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना वाढतच असल्याचे दिसतेय. रावेर तालुक्यातील खिरोदा येथे ४ हजाराची लाच घेणाऱ्या तलाठीसह कोतवालास लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केल्याची घटना आज गुरुवारी घडली. या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रमोद प्रल्हाद न्हायदे (वय-४५) रा. गणेश कॉलनी, फैजपुर) असं लाचखोर तलाठ्याचे नाव असून शांताराम यादव कोळी (वय-५२) रा. रावेर) असं कोतवालाचे नाव आहे.

नेमकी काय आहे घटना?
खिरोदा येथील तक्रारदार यांचे वडीलोपार्जीत शेती ही दोन्ही भावांच्या नावावर आहे. दरम्यान, तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झाल्याने त्याच्या नावावर असलेली शेती भावाची पत्नी व मुलगा यांनी वारस लावण्याची नोंद करण्याच्या मोबदल्यात तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे आणि कोतवाल शांताराम यादव कोळी यांनी चार हजाराची मागणी केली. दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाला तक्रार दिली.

त्यानुसार विभागाने गुरूवार ६ एप्रिलरोजी दुपारी सापळा रचून पंचांसमक्ष तलाठी प्रमोद न्यायदे यांनी कोतवाल शांताराम कोळी यांच्या समोर ४ हजाराची लाच स्विकारली. लाच स्विकारताच जळगाव लाचलुचपत विभागाने दोघांना रंगेहात पकडले. याप्रकरण सावदा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.