जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र.चा गावातील युवकाला नाचण्याच्या कारणावरून चाकूने पोटावर, मांडीवर, हातावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न २८ डिसेंबरला झाला होता. जखमी तरुणाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे चारही संशयितांवर खुनाचे कलम वाढविले आहे.
बांभोरी येथील संशयित विजय नन्नवरे, संदीप नन्नवरे, ज्ञानेश्वर नन्नवरे आणि अजय नन्नवरे या चौघांनी अतुल कोळीला (वय २५) मारहाण केली होती. तसेच संशयित अजय नन्नवरे याने चाकूने अतुलच्या पोटावर, मांडीवर, हातावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. जखमी अतुल कोळी याच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पाचव्या दिवशी अतुलचा मृत्यू झाल्याने खुनाचे कलम वाढले.
हे देखील वाचा :
- तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश
- जळगाव शहरात अपघाताची मालिका सुरूच: भीषण अपघातात महिलेचा मृत्यू
- अॅड. प्रवीण चव्हाणांना ‘या’ अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर
- भरधाव कार झाडाला धडकली; रावेरचे तिघे तरुण जागीच ठार
- जळगावत अपघाताची मालिका सुरूच; फुपनगरी फाट्याजवळ भीषण अपघातात दोघे मित्र ठार