⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | अन् १२ वर्षांपासूनची गुडघेदुखी झाली गायब !

अन् १२ वर्षांपासूनची गुडघेदुखी झाली गायब !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२३ ।  सुरवातीला सामान्य वाटत असली तरी भविष्यात गुडघेदुखीमुळे रुग्ण बेजार होतो आणि टोटल क्नी रिप्लेसमेंटशिवाय पर्याय उरत नाही. अशाच एका ५० वर्षीय रुग्ण महिलेने तब्बल १२ वर्षे गुडघेदुखी सहन केली मात्र नुकतीच डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात निष्णात क्नी रिप्लेसमेंट तज्ञांद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेच्या दुसर्याच दिवशी रुग्ण पायांची हालचाल यशस्वीरित्या करु शकते, हे त्याचे वैशिष्ट्ये आहे.

सविस्तर वृत्त असे की, खामगाव तालुक्यातील ५० वर्षीय आशा (नाव बदललेेले) नामक रुग्ण महिलेने सांगितले की, बारा वर्षापूर्वी गुडघे दुखी सुरु झाली. गोळ्या-औषधी घेऊन तात्पुरते दुखणे थांबले परंतु पुन्हा गुडघेदुखी सुरु. कित्येक दवाखाने फिरले परंतु उपयोग झाला नाही, अखेरीस डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात आम्ही आलो, येथे अस्थिरोग डॉ.दिपक अग्रवाल यांना भेटलो, त्यांनी गुडघ्यात येणारी सूज, होणार्या वेदना या सर्व जाणून घेत काही तपासण्या केल्या, त्याअंती गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला त्यांनी दिला. दोघी गुडघे बदलावे लागणार होते, परंतु डॉक्टरांनी गुडघे प्रत्यारोपणाची संपूर्ण माहिती दिली तसेच शस्त्रक्रियेनंतरचे व्यायामाचा सरावही करुन घेतला.

सुरवातीला ऑपरेशनची खूप भीती वाटायची, चालता येईल का, बसता येईल का ? परंतु डॉक्टरांच्या समुपदेशनाने भीती दूर झाली, सर्वात आधी उजव्या आणि नंतर डाव्या गुडघ्याची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेच्या चौथ्या दिवशीच माझा त्रास मोठ्या प्रमाणावर कमी झाला, डॉक्टर दररोज माझ्याकडून व्यायाम करुन घेतात. डॉक्टरांच्या रुपात जणूकाही देवानेच मला गुडघेदुखीच्या वेदनेतून बाहेर काढले असे रुग्ण आशा यांनी सांगितले. याप्रसंगी रुग्णाच्या डोळ्यात आनंदाश्रृ तर आभारासाठी हात जोडलेे होते. अशाप्रकारचे भावनिक बंध येथे डॉक्टर व रुग्णांमध्ये जुळत असून रुग्णांनी उपचारासाठी डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयातच यावे असे आवाहन आशाताईंनी यावेळी केले.

दिर्घकालीन गुडघेदुखीवर शस्त्रक्रिया हाच पर्याय
दररोजच्या ओपीडीत गुडघेदुखीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर येतात. यात फार जूनी गुडघेदुखील असल्यास गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच उत्तम पर्याय आहे. शस्त्रक्रियेच्या दुसर्याच दिवशी रुग्णाकडून हळूहळू व्यायाम आम्ही करुन घेतो. यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास वाढतो व गुडघेदुखीतून सुटका झाल्याचा आनंदही रुग्णाला मिळतो.

डॉ.दिपक अग्रवाल (जाँईट रिप्लेसमेंट सर्जन, विभागप्रमुख, अस्थिरोग, डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालय)

author avatar
टीम जळगाव लाईव्ह