जळगाव लाईव्ह न्यूज | ३० एप्रिल २०२३ | भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये आमदार किशोर पाटील यांनी आपला गड राखला आहे. प्रचंड चुरस असलेल्या या निवडणुकीत अखेर आमदार किशोर पाटील यांनी बाजी मारली आहे.
पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी तीन पॅनलमध्ये तगडी लढत झाली. यात शिवसेनेतर्फे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल मैदानात होते. महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार दिलीप वाघ तसेच वैशाली सूर्यवंशी यांचे पॅनल उभे होते. तर भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे स्वतंत्र पॅनल उभे होते.
यात किशोरआप्पा पाटील यांच्या पॅनलला नऊ जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला सात जागांवर समाधान मानावे लागले असून अमोल शिंदे यांच्या पॅनलला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. यामळे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी गड राखला असेच म्हटले