⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

किसनराव नजन-पाटलांच्या हाती ‘एलसीबी’ची धुरा!

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना निलंबित करण्यात आले आहे. एलसीबीच्या निरीक्षकपदाची धुरा पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी नुकतेच काढले आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक, किसन लक्ष्मण नजन, पाचोरा पोलीस ठाणे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचे नियमित नेमणुक आदेश होईपावेतो त्यांचा मुळ नेमणुक पाचोरा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी या पदाचे कामकाज सांभाळून पाहतील.

दरम्यान, किसनराव नजन-पाटील हे डॅशिंग अधिकारी म्हणून जिल्ह्याला परिचित आहेत. तसेच स्वभाव शांत आणि कायद्याचे भोक्ते असल्यामुळे हा पदभार त्यांच्याकडे कायम ठेवला जाण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. परंतू त्यांचे विभागीय पोलीस अधिकारी म्हणून प्रमोशन अवघ्या काही महिन्यात होणार असल्याचे कळते. जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर जळगाव शहर, चोपडा, भुसावळ, पाचोरा पोलीस स्थानक असा श्री.नजन पाटील यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ आहे.