---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

किरणकुमार बकालेंना पुन्हा झटका ; खंडपीठानेही अटकपूर्व जामीन फेटाळला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एलसीबीचे तत्कालीन निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज औरंगाबाद न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी बकाले यांना कोर्टाने झटका देत अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. याआधी जळगाव जिल्हा न्यायालयानेही बकालेचा अर्ज फेटाळून लावला होता.

kiran kumar bakale jpg webp

नेमकं काय आहे प्रकरण?
एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होते. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बकालेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

---Advertisement---

मात्र तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर औरंगाबाद न्यायालयात जामीन अर्ज टाकण्यात आला होता. परंतू तेथे देखील आज तो अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. या वृत्ताला हस्तक्षेप याचिकाकर्ते प्रशांत इंगळे यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान या प्रकरणाचा तपास जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडून काढून तो होम डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांनी बकाले यांच्या शोधार्थ तीन पथकांची नेमणूक केली होती. यातील दोन पथके नुकतीच रिकाम्या हाती नुकतेच परत आले आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---