---Advertisement---
गुन्हे यावल

किनगाव येथील वृध्दाच्या खुनाचा उलगडा ; सुनेनेच तरुणाच्या मदतीने सासऱ्याला संपविले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२३ । यावल तालुक्यातील किनगाव येथील वृध्दाच्या खून प्रकरणी एक मोठी बातमी समोर आलीय. सुनेनेच तरुणाच्या मदतीने सासऱ्याच्या खून केल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी सुनेसह एका तरूणाला अटक केली असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

crime 2 jpg webp webp

नेमकी काय आहे घटना?
यावल तालुक्यातील किनगाव येथील भीमराव शंकर सोनवणे (६०) यांचा शुक्रवारी किनगाव चुंचाळे रस्त्यावरील नाल्याचे पुलाखाली मृतदेह आढळून आला होता. त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आलेली होती.

---Advertisement---

याबाबत खुन झालेल्या व्यक्तिच्या मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांनी यावल पोलीस ठाण्यात खून झाल्याची फिर्याद दिली होती . याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असतांना त्यांना सुनेवर संशय आला. यातून तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. यात भीमराव सोनवणे यांनी आपल्या सुने कडे शरीर सुखाची मागणी केली असता सुनेने नाकारली. या वादातुन सुनेने संशयित आरोपी जावेद शाह अली शाह, (वय २८ रा. वरणगाव ह.मु. उदळी तालुका रावेर) याच्या मदतीने सासरे भिमराव सोनवणे यांचा धारदार हत्याराने निर्युण खुन केल्याची माहिती समोर आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाते फिरवुन तात्काळ कारवाई करत या खुन झाल्या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी सुनेने प्राथमिक माहिती देतांना सासर्‍यावर आरोप लावला असला तरी याला अजून काही वेगळा आयाम आहे का ? या दृष्टीने पोलिसांची चौकशी सुरू आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---