---Advertisement---
गुन्हे यावल

जळगाव जिल्हा पुन्हा खुनाच्या घटनेने हादरला ; दगडाचे ठेचून वृद्धाचा निर्घृण खून

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२३ । जळगाव जिल्ह्यात पुन्हा खुनाची घटना समोर आलीय. ६० वर्षीय वृद्धाचा गळा चिरून व दगडाचे ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना किनगाव-चुंचाळे रस्त्यावरील ढोल्या मोह नदीच्या पुलाखाली घडली आहे.भिमराव शंकर सोनवणे (वय-६०) रा. किनगाव बुद्रुक ता. यावल असे मृत वृध्दाचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

murder raver

नेमकी काय आहे घटना?

---Advertisement---

यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील रहिवाशी असलेले भिमराव सोनवणे हे खासगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवारी २३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने गळ्यावर वार केले. त्यानंतर दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. ही घटना किनगाव-चुंचाळे रस्त्यावरील ढोल्या मोह नदीच्या पुलाखाली घडली आहे.

हा प्रकार आज शुक्रवारी २४ मार्च रोजी सकाळी उघडकीला आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती‍ मिळाल्यानंतर फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे, पोलीस पथक हे घटनस्थळी दाखल झाले आहे. यावेळी मृतदेहाचा पंचानामा करण्यात येत असून आरोपींच्या शोधासाठी श्वानपथक घटनास्थळी आले असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. या घटनेबाबत मयताचा मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. हा खून कोणत्या कारणासाठी व कुणी केला याची माहिती अद्यापपर्यंत उपलब्ध झालेली नाही.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येतेय. आठवड्याभरात खुनाची तिसरी घटना समोर आलीय. यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नसल्याचे दिसून येतेय.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---