⁠ 
सोमवार, मे 13, 2024

खिर्डी येथे लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । रावेर तालुक्यातील खिर्डी येथे अवैध मद्यसाठा विक्री करणाऱ्या दोन संशयितांना राज्य उत्पादन शुल्क भुसावळ पथकांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील तब्ब्ल ४० बॉक्स असे एकूण १,१७,२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कुलदिप भागवत जैस्वाल व जितेंद्र रमेश जैस्वाल असे संशयित आरोपींचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क भुसावळ यांच्या पथकास रावेर तालुक्यातील खिर्डी येथे अवैध मद्यसाठा विक्री होत असल्याची गोपिनीय माहिती मिळाली. त्यानुसार ८ रोजी छापा टाकून कारवाई केली असता २ आरोपीस ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून देशी दारुचे एकूण ४० बॉक्स असा १,१७,२२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी कुलदिप भागवत जैस्वाल व जितेंद्र रमेश जैस्वाल असे नाव आहे. हा अवैध मद्यसाठा मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता असून याबाबत तपास सुरू आहे.

यांनी केली कारवाई

विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, दुय्यम निरीक्षक विजय ठेंगडे, तसेच विभागिय निरीक्षक पथकाचे जवान वाहनचालक सागर देशमुख, दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, जवान नितीन पाटील, विठ्ठल हाटकर यांनी यशस्वी रित्या पार पाडली. तपास विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक सिमा झावरे यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागीय निरीक्षक सुजित कपाटे हे करीत आहेत.