⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना खा.रक्षा खडसेंचा मदतीचा हात, किराणा किट वाटप

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना खा.रक्षा खडसेंचा मदतीचा हात, किराणा किट वाटप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । यावल येथील एसटी आगारात आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांची खासदार रक्षा खडसे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली. यावेळी संपामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झालेल्या कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वितरण करण्यात आले. यात १८५ कर्मचाऱ्यांना किट देण्यात आले. उर्वरित कर्मचाऱ्यांनाही हे किट दिले जाणार असल्याचे प्रतिपादन दिले.

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी अडीच-तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर असून आंदाेलन करत आहेत. संप काळामध्ये त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. परंतु तरी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. या आंदोलकांना यापूर्वीच भाजपने पाठिंबा दिला आहे. सोमवारी येथील एसटी आगारात खासदार रक्षा खडसे यांनी भेट दिली. संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने त्यांना किराणा किटचे वितरण केले.

या प्रसंगी जि.प.सभापती रवींद्र पाटील, जि.प.सदस्य सविता भालेराव, पं.स. सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, पं.स.सदस्य दीपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, माजी नगराध्यक्ष पिंटू राणे, नारायण चौधरी, डॉ.कुंदन फेगडे, बाजार समितीचे उमेश पाटील, राकेश फेगडे, पुरूजित चौधरी, विलास चौधरी, डॉ.नीलेश गडे, उमेश फेगडे, बाळू फेगडे, सागर कोळी, रितेश बारी, योगेश चौधरी, परेश नाईक, किरण महाजन, व्यंकटेश बारी आदी उपस्थित हाेते.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह