आदिलशाह फारुकी संस्थेतर्फे खान्देश भूषण पुरस्कार सोहळा
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे १३ नोव्हेंबर, रविवार रोजी “महाराष्ट्र गौरव, खान्देश भूषण पुरस्कार २०२२” चे वितरण करण्यात येणार आहे. संस्थेचा हा वार्षिक१५ वा पुरस्कार वितरण सोहळा असणार आहे, कार्यक्रमाचे आयोजन अल्पबचत भवन, (जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी ) जळगाव या ठिकाणी करण्यात आले आहे.
यांना सन्मानित करण्यात येणार
संतोष रणसिंग, पुणे. अनिल विज्ञान महिरराव, धुळे. प्रा.मंदाकिनी नवल भामरे, सुनील अमृत गोपाळ धुळे , सुरेश तेजराव केवडकर वाशिम, कल्परुण सोशल फौंडेशन (पुणे),शेख नबी शेख गनी (जळगाव), मोहसीन खान अजिज खान धरणगाव , डॉ शोएब एम हारून पटेल,जळगाव, मंगल सतीश सासवडे, शिरूर, पुणे, प्रमोद पाटिल चिलाणेकर एरंडोल, जितेंद्र केवलसिंग पाटिल, अब्दुल हाफिज अब्दुल हक ,धुळे, प्रशांत लोहार,निमझरी,धुळे ,शबनम समीर डफेदार,टीम एक्सप्लोर खान्देश, धुळे/जळगाव/नंदुरबार,अनिस अहमद अय्युब शाह,जळगाव, भिका सोमा सपकाळे जळगाव, वसंत विनायक पाटील, चाळीसगाव, सुनील भिवा जाधव,पारोळा, मुफ्ती अरशद अली फैजपुर, मुफ़्ती मो.हारून नदवी,जळगाव, माधुरी राजेश करड़े,पुणे, हाजी अ. मजीद जकरिया जळगाव, मिनाक्षी विजयकुमार वयकोडे,भुसावळ,प्रो.डॉ. मोहम्मद सादिक शेख,भुसावळ,भरत राजेंद्र कर्डिले जळगाव,वडगांव ग्राम पंचायत वडगाव यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर कार्यक्रमात दर वर्षी काही मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येतो. त्याचप्रमाणे वेळी,ऍड.जुबेर शेख धुळे, हकीम आर चौधरी मुक्ताईनगर,इकरा फाउंडेशन धरणगाव,अमिना बी तडवी प.स.उपसभापती,एजाज बागवान नंदुरबार,महेंद्र पाटील वरगव्हान,डॉ.पाकिजा पटेल/डॉ.उस्मान पटेल,डॉ.नुरुद्दीन मुल्लाजी,उमेश रमेश कासट अडावद, कविता बोदवड आदीचा समावेश असणार आहे.
कार्यक्रमाची वेळ सकाळी १०:३० ते १:०० असणार असून कार्यक्रमात आमदार राजू मामा भोळे जळगाव, माजी विधानसभा अध्यक्ष अरूण गुजराथी,लोकनियुक्त सरपंच भावना ताई माळी अडावद ,डॉ.करीम सालार जळगाव, प्रा.शिवाजीराव महिरराव एरंडोल,फारूक शेख जळगाव, एड.जुबेर शेख धुळे,हकीम आर.चौधरी मुक्ताईनगर, जहांगीर खान जळगाव ,यशवंत निकवाडे धुळे,अजमल शाह जळगाव, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होईल म्हणून सर्व मान्यवरांनी सहकुटुंब वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष फारूक शाह नौमानी, उपाध्यक्ष डॉ.जावेद शेख,मार्गदर्शक फारूक पटेल अडावद,सचिव जुबेर शाह यांनी केले आहे.