जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । 217 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती मी स्थगिती आणला हा खडसे यांचा आरोप म्हणजे निव्वळ धूळफेक व हास्यास्पद आहे. खडसे यांनी स्थगिती मिळालेल्या कामांची यादी जाहीर करावी, असे आव्हान आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले असून केवळ पाच कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती मिळाल्याचा दावा पत्रकार परीषदेत शुक्रवारी सायंकाळी केला. 30 वर्षात मुस्लिम समाजाच्या सामाजिक सभागृहासाठी एक करोड रुपये कधी आणले का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करीत आपण सावदा व मुक्ताईनगर येथे हा निधी आणल्याचे सांगून ते म्हणाले की, सावदा येथे निधी मंजूर केल्यावर तुमच्याच कार्यकर्त्याने रीट पीटीशन दाखल करून त्या कामाला स्थगिती देण्याचा प्रयत्न केला हा करंटेपणा कोणाचा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आमदार पाटील म्हणाले की, कायद्यानुसार ग्राम विकास मंत्रालयामार्फत मंजूर करण्यात आलेला पैसा हा नगरविकास खात्याच्या त्या अंतर्गत असलेल्या नगरपंचायतीत खर्च करणार कसा ? हा कायदा खडसे साहेब यांना माहीत असूनही केवळ ते दिशाभूल करीत आहेत. मी तुमच्या जिवावर निवडून आलेलो नाही, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार यांची कृपा व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची साथ आणि शेवटच्या मतदारापर्यंत मला केलेली मदत यामुळे मी निवडून आल्याचे ते म्हणाले. तुम्ही त्यावेळी कुठे होतात ? असा प्रतिसवाल देखील त्यांनी केला. गिरीश महाजन हे माझ्या घरी आले होते मी त्यांना चौकात सत्कार करायला गेलो नव्हतो आणि पालकमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीने उत्तर देणे योग्य नाही. 25/15 या योजनेमध्ये केवळ आमदारांना निधी मागण्याचा हक्क असतो, तुम्ही इतके वर्ष आमदार, मंत्री होते मी कधी मागितला का मग तुमचा याच 25/15 हेड मध्ये निधी मागण्याचा हट्ट का? शेमळदा फुल मंजूर करण्यासाठी तुमच्या अनुभवाचा फायदा आम्हालाही हो द्या, उद्या सोबत या, नक्कीच काम मंजूर करू, असे सांगून ते म्हणाले की, मतदारसंघ 30 वर्षे पायाभूत सुविधांपासून वंचित राहिला असून मुख्यमंत्र्यांनी 217 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिलेली नाही. विकासकामांच्या संदर्भात तुम्हाला कुठे आमदारांचे पत्र लागत असेल तर मी केव्हाही द्यायला तयार आहे, असे प्रति आव्हानदेखील पाटील यांनी खडसे यांना केले.
खडसे यांच्या म्हणण्यानुसार मी शिवसेनेचा आमदार आहे, असे विधी मंडळात लिहून द्या याला उत्तर देताना पाटील म्हणाले की. मी शिवसेनेचा अधिकृत राजीनामा देऊन निवडणूक लढवली व विजयी झालो. कायदा आम्हालाही कळतो, असेही आमदार म्हणाले.