⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

काल बलवान होता है ; ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यासोबतच सत्तेत जाऊन बसले !

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात भारतीय जनता पक्षाने बैलगाडी भरून पुरावे एकत्रित आणत याची चौकशी व्हावी यांनी भ्रष्टाचार केला आहे असा दावा केला होता. मात्र आता काळ बदलला असून त्याचा भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व नेत्यांना भारतीय जनता पक्षाने वॉशिंग मशीन मध्ये घातले असून त्यांच्यासोबतच सत्तेत बसले आहेत. असे यावेळी आमदार एकनाथराव खडसे म्हणाले.

यावेळी ते म्हणाले की, मी विरोधी पक्षनेता असताना आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचार केल्याचे आरोप करत होते. मात्र आता काळ बदलला आहे. काळ बलवान होत आहे. ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले. त्यांनाच आज त्यांनी आपल्या पक्षात घेऊन सत्तेची खुर्ची दिली आहे.

छगन भुजबळ राष्ट्रवादीसोबत नाहीत. यामुळे काही प्रमाणात पोकळी नक्कीच निर्माण होईल. मात्र दुसऱ्या चेहरा लगेच उभा राहील. असे यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले. याचबरोबर मी देखील ओबीसी चेहरा असल्याचे ते म्हणाले.