⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

खडसे हे सर्व जातीधर्माला न्याय देणारे नेतृत्व : रोहिणी खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । मुक्ताईनगर शहरातील माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना राजकारणात पदे दिली. अगदी सामन्यातील सामान्य व्यक्तींना त्यांनी आमदार, खासदार, सभापती, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच बनवले, कार्यकर्त्यांसाठी जिवाचे रान केले, असे प्रतिपादन अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी जनसंवाद यात्रेत तांदलवाडी येथील कॉर्नर सभेत केले. त्या म्हणाल्या की, नाथाभाऊ यांनी नेहमी विकासाचे राजकारण केले, विकासकामे करताना त्यांनी कधी कोणताही भेदभाव केला नाही या परिसरातील प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला. तापी काठावरील अजून काही गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे. नाथाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही तो सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांना दिले. रावेर तालुक्यातील सुनोदा, मांगलवाडी, तांदलवाडी येथील ग्रामस्थांसोबत संवाद साधला.

यावेळी निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, सोपान पाटील, यु.डी.पाटील, प्रल्हाद बोडे, रामभाऊ पाटील, विलास धायडे, किशोर चौधरी, अतुल पाटील, कैलास सरोदे, सुनील कोंडे, प्रकाश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.