---Advertisement---
कृषी जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

खडसे म्हणाले आमच्या पालकमंत्र्यांचं शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष; गुलाबरावांनी दिलं हे प्रतिउत्तर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | 21 मार्च 2023 | अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधत शेतकरी हवालदिल झाला असताना जळगावचे पालकमंत्री मात्र दुर्लक्ष करत असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली. याला प्रतिउत्तर देत, विरोध करणे हे खडसेंचे कामच आहे, त्यांनी तो कायम करायलाच पाहिजे व त्याशिवाय मजा येत नाही अशी प्रतिक्रिया देत मंत्री गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला.

khadse and gulabrao patil jpg webp

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे. यासोबत जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला. शेतकर्‍यांचं नुकसान झालं आहे पण एकही मंत्री तिथे गेला नाही. या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना वेळ नाही. ते अन्य कामांमध्ये व्यस्त आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील पालकमंत्री किंवा अन्य मंत्री ना कापसावर बोलत आहे ना केळीच्या पिकावर, अशी टीका करत शेतकर्‍यांचे सर्व कर्ज माफ करण्याची मागणी एकनाथ खडसेंनी केली.

---Advertisement---

बरेच लोक संपावर असल्याने थोड्या अडचणी येत आहेत. मध्ये शनिवार रविवारसुद्धा होता. पण आपण नियमीतपणे सर्वांना आदेश दिले असून सर्व शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे होतील. एकही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही. एकनाथ खडसे यांचे कामच आहे विरोध करणे. त्यांनी तो करायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय मजा येत नाही, असे प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---