जळगाव जिल्हाराजकारण

जब मिल बैठे तीन यार : खडसे, गुलाबराव और चिमणराव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ.चिमणराव पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी देखील गुलाबराव पाटलांचे फारसे जमत नाही. दरम्यान, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांची मुंबईत पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ.चिमणराव पाटील यांनी एकत्र भेट घेतली. रुग्णालयातून घरी परतल्यावर खडसेंची ही सदिच्छा भेट असली तरी अनेकांच्या या भेटीने भुवया उंचावल्या आहे.

जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्ये आजवर अनेकवेळा शाब्दिक कलगीतुरा रंगलेला आहे. सध्या दोन्ही नेते महाआघाडी सरकारमध्ये असल्याने ते एकमेकांवर टीका टिपणी करत नाही. काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यावर विद्यमान आ.चिमणराव पाटील यांनी टीका करीत घरचा आहेर दिला होता. माजी मंत्री एकनाथराव खडसे हे काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थतेमुळे मुंबई येथे उपचार घेत होते. रुग्णालयातून त्यांची सुट्टी करण्यात आली असून ते मुंबईतच आहेत. बुधवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांनी एकनाथराव खडसेंची सदिच्छा भेट घेतली. तब्येतीची विचारपूस करून त्यांनी औपचारिक चर्चा केली. दरम्यान आगामी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नशिराबाद निवडणूक संदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. आजची भेट राजकीय नसली तरी या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button