जळगाव जिल्हाजळगाव शहर

केजीएफ-२ची बंपर कमाई : केवळ २ दिवसांत जगभरात कमावले ३०४ कोटी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । जगभरातील कमाईचे आकडे पाहता केजीएफ-२ ने ३०० कोटींच्या वर कमाई केली आहे. पहिल्या दिवशी १६४ कोटी, दुसऱ्या दिवशी १३९ कोटी कमावले. केजीएफ-२ ने पहिल्या दिवशी हिंदी व्हर्जनमध्ये ५३ कोटी कमावले. म्हणजे खर्चाच्या अर्धी कमाई.केजीएफ-२ च्या हिंदी व्हर्जनने सुरुवातीच्या दोन दिवसांतच १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. यामुळे या चित्रपटाने आरआरआर (४४ कोटी रु.) आणि बाहुबली-२ (८२ कोटी रु.) यांना मागे टाकत आपला बोलबाला सिद्ध केला आहे.

बॉलीवूडमध्ये सिक्वेलचा नवा काळ सुरू झाला आहे. या वर्षी विक्रमी १४ चित्रपटांचे सिक्वेल येणार आहेत. यापूर्वी ६७ वर्षांच्या इतिहासात ९८ चित्रपटांचे एकूण १५७ सिक्वेल बनले. त्यापैकी ११ ब्लॉकबस्टर, ५४ हिट आणि ७४ फ्लॉप ठरले. १८ चित्रपटांची स्थिती स्पष्ट होऊ शकली नाही. सर्वाधिक ८-८ चित्रपटांच्या २ मालिका (खिलाडी, नंबर-१) आल्या. हिंदीत पहिला सिक्वेल (हंटरवाली की बेटी) १९४३ मध्ये आला. हा १९३५ मधील हंटरवालीचा सिक्वेल होता.

हे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
सिम्बा ३९९
दबंग २ २५४
टायगर जिंदा है ५७१
धूम ३ ५८५
हाऊसफुल ४ २८०
गोलमाल अगेन ३११
रेस ३ ३०५
क्रिश ३ २९२
बागी २ २५३
डॉन २१५

Related Articles

Back to top button