जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली अभिनेत्री केतकी चितळे हिला भोवली आहे. कारण याप्रकरणी ठाणे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.
केतकी चितळेला नवी मुंबईच्या कळंबोली येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. ठाणे गुन्हे शाखा घटक १ ने ही कारवाई केलीये. ठाणे गुन्हे शाखा घटक १ ने केतकी चितळेचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले होते. सध्या कळंबोली पोलीस ठाण्यात केतकीच्या जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेचे पथक तिला ठाण्यात घेऊन येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
केतकी चितळेने शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्याबाबत खुद्द पवारांनाच विचारलं असता कोण केतकी चितळे माहिती नाही. तिने माझ्याबाबत काय लिहिलं माहिती नाही, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिलीय.
केतकी चितळेची पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट काय?
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll