जळगाव लाईव्ह न्यूज । काश्मीर विद्यापीठाने (Kashmir University) 30 डिसेंबर रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. प्रतिकूल हवामानामुळे हा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “खराब हवामानामुळे काश्मीर विद्यापीठाच्या ३० डिसेंबरला होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.”पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांच्या सुधारित तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील, असे अधिकाऱ्याने सांगितले.