---Advertisement---
पाचोरा

भाजपा व्यापारी जिल्हा आघाडीच्या अध्यक्षपदी कांतीलाल जैन यांची फेरनिवड

pachora
---Advertisement---

पाचोरा येथील बनोटीवाला ज्वेलर्स  चे संचालक,मा.नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी उद्योजक कांतीलाल जैन  यांची भाजपा व्यापारी जिल्हा आघाडीच्या अध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे  यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.

pachora

यावेळी आमदार भोळे यांनी बोलताना सांगितले की कांतीलाल जैन यांच्या माध्यमातून जिल्हा व्यापारी बांधवांच्या समस्या व अडचणी नक्कीच मार्गी लागतील तसेच सतत होणाऱ्या लॉकडाऊन मुळे व्यापाऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे.परंतु या आघाडी सरकारने व्यापाऱ्यांना पूर्णपणे दुर्लक्षित केले असून भाजपा व्यापारी आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या समस्यांचे निरासरण करण्यासाठी पर्यंत केले जातील.

---Advertisement---

तसेच कांतीलाल जैन यांना पुन्हा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती दिल्याने नक्कीच पाचोरा व भडगाव तालुक्याला याचा फायदा होईल व व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविल्या जातील असे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले तसेच पाचोरा तालुक्याला पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार भोळे यांचे देखील त्यांनी आभार या प्रसंगी मानले, यावेळी पाचोरा भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी सरचिटणीस गोविंद शेलार,रमेश शामनानी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---