पुर्ण वेळ समुपदेशकाची सुविधा असल्याने अनेक विदयार्थ्यांना लाभ

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । गोदावरी सीबीएसई स्कुलच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी व समुपदेशक लिना चौधरी यांच्या मदतीने तणाव व आजारावर मात करीत १० परिक्षेत ७२ टक्के मिळवत कनिष्का राहुल कुळकर्णी हिने यश प्राप्त केले आहे.पुर्ण वेळ समुपदेशक सुविधा असल्याने अनेक विदयार्थी व पालकांना लाभ होत आहे.
गेल्या दिड वर्षापासून पचन व पोटदुखीचा भयंकर त्रास असलेल्या कनिष्काचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्याने निदान होत नव्हते. आजारपण, सततचा दवाखाना आणि तपासण्यातून अभ्यासाकडे दुर्लक्ष व तणाव निर्माण झाला होता. अशातच गेल्या ११ महिन्यापासून तिचे ८८ वर्षीय आजोबा आजारपणामूळे बेडवर असल्याने अत्यंत तणावात तिने दहावीचा अभ्यास सुरू केला. गोदावरी स्कुलच्या प्रिन्सीपल निलीमा,समुपदेश लिना चौधरी आणि वर्गशिक्षीका कविता पाटील यांनी तिची परिस्थीती ओळखून समुपदेशन व विशेष मार्गदर्शन सुरू केले.कनिष्काने देखिल आपले व आजोबांचे आजारपण तणावातून बाहेर येत रात्रदिवस एक करीत १० वी सीबीएसईत ७२ टक्के मिळवत यश प्राप्त केले. गोदावरी फॉउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी राहूल कुळकर्णी यांची ती मुलगी आहे. गोदावरी संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, ,संचालिका डॉ. केतकी पाटील ,हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनिकेत पाटील, डॉ.अक्षता पाटील आणि शाळेच्या प्राचार्य सौं. नीलिमा चौधरी व सर्व शिक्षकांनी तसेच समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
अनेक वेळा आजारपण सततच्या तपासण्या आणि प्रचंड अभ्यास यामूळे विदयार्थ्यांवर तणाव निर्माण होवून परिणाम होत असतो व निराशा पदरी पडते पण कनिष्काचे पालक,प्रीन्सीपल निलीमा आणि आम्ही पालकांच्या संपर्कात राहत सतत समुपदेशन आणि मार्गदर्शनातून तिला प्रोत्साहन दिल्याने हे शक्य झाले.
लिना चौधरी समुपदेशक
आजच्या परिस्थीतीत अभ्यासाचे ओझे आणि बदललेली जिवनशैली मूळे अनेकांना या परिस्थीतीतून जावे लागत आहे त्यामुळे शाळेच्या प्रशासनाने अनेक वर्षापासून समुपदेशनाचा हा उपक्रम सुरू ठेवला असून निश्चीतच त्याचा फायदा विदयार्थ्यांना व पालकांना होवून यश मिळवणे सोपे जाते. प्रिन्सीपल निलीमा चौधरी गोदावरी स्कुल संस्थाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील आणि सचिव डॉ. वर्षा पाटील यांच्यासह शाळेतील समुपदेशक, प्रिन्सीपल निलीमा चौधरी आणि वर्गशिक्षीका कविता पाटील सर्व शिक्षक तसेच माझे वडील वैद्यकिय क्षैत्रात काम करीत असल्यामूळे तणावावर मात करत दिवस रात्र अभ्यास करीत यश मिळवल्याचा आनंद वाटतो मला वैद्यकिय तज्ञ व्हायची इच्छा आहे.
– कनिष्का कुळकर्णी