जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१। चाळीसगाव येथील पत्रकार सुर्यकांत कदम यांना आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेतर्फे ‘पत्रकार रत्नम’ पुरस्काराने पुणे येथे सन्मानित करण्यात आले. कदम याना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल ‘मेरा गाव मेरा तीर्थ’ तर्फे त्यांचा दि.१० रोजी सत्कार करण्यात आला.

‘पत्रकार रत्नम’ हा राष्ट्रीय पुरस्कार आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेच्यावतीने चाळीसगावमध्ये प्रथमच सुर्यकांत कदम यांना मिळाल्याचा आनंद असल्याचे ‘मेरा गाव मेरा तीर्थ’चे खुशाल पाटील, प्रवर्तक विजय शर्मा यांनी सांगितले. याप्रसंगी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, नगरसेवक घुष्णेश्वर पाटील, सचिन स्वार आदी उपस्थित होते.