भुसावळचे पत्रकार गणेश वाघ यांचा कै.कृष्णराव पाटील कोठवळे पुरस्काराने सन्मान

जानेवारी 6, 2024 4:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२४ । भुसावळातील दैनिक तरुण भारतचे उपसंपादक गणेश रामकृष्ण वाघ यांना पत्रकार दिनाचे औचित्य साधून नाशिक येथील श्री कालिका देवी मंदिर संस्थानच्या वतीने कै. कृष्णराव पाटील कोठवळे (नाशिकचे मुलकी व पोलीस पाटील) पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

ganesh wagh jpg webp

नाशिक येथील स्वामी रामकृष्ण परमहंस मार्ग, जुना आग्रा रोड येथे शुक्रवारी दुपारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील एका पत्रकाराची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात भुसावळ तालुक्यातील गणेश वाघ यांची निवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून गणेश वाघ हे पत्रकारीतेत कार्यरत आहे. त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now