शनिवार, डिसेंबर 2, 2023

जळगावमध्ये 12 पास महिलांसाठी नोकरीची संधी.. ‘इतका’ पगार मिळेल?

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । एकात्मिक बालविकास सेवा योजना, अंतर्गत जळगाव मध्ये भरती निघाली आहे. “अंगणवाडी मदतनीस” पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुलै 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस
शैक्षणिक पात्रता – अर्ज करणारा उमेदवार हा किमान 12वी पास असावा.
वयोमर्यादा –
किमान १८ ते कमाल ३५ वर्षे
विधवा महिला असल्यास कमाल ४० वर्षे

नोकरी ठिकाण – जळगाव

किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 5,500/- रुपये पगार मिळेल
अर्ज पद्धती – ऑफलाईन
र्ज पाठविण्याचा पत्ता – मुक्ताईनगर कार्यालय, जळगाव
अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट – jalgaon.gov.in

भरतीची अधिसूचना पहा : PDF