जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील टाकळी शिवारात चिचॉल रोडवरील हॉटेल स्वप्नपूर्ण च्या आडोशाला पाठीमागे सुरु असलेल्या ‘झन्ना मन्ना’ जुगारींवर दि.२४ रोजी पोलिसांना छापा मारला. यात सुमारे १ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत वरणगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी शिवारात चिचॉल रोडवरील हॉटेल स्वप्नपूर्ण च्या आडोशाला पाठीमागे संशयित समाधान बाजीराव पाटील वय ३० रा. वढवे व वसंत भलभले रा. मुक्ताईनगर असे दोन इसम ‘झन्ना मन्ना’ नावाचा हार जित’चा’ जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दि. 24 रोजी 19.45 छापा मारला. दरम्यान, १ लाख ५६ हजार रुपयांच्या मुद्देमालासह सर्जय विश्वनाथ पाटील वय-40 रा. वढवे ता. मुक्ताईनगर, राजेश जगदिश पाटील वय 38 रा. काहुरखेडा ता. भुसावळ, शेख अन्वर शेख अकबर वय 43 रा. रामपेठ वरणगाव ता. भुसावळ, शेख नईम शेख रहेमान वय 52 रा. रामपेठ वरणगाव ता. भुसावळ, नितिन निवृत्ती माळी वय 42 रा. मकरंद नगर वरणगाव ता. भुसावळ, गौरव अनिल तळेले वय 24 रा. मुकाईनगर, सचिन सोपान इंगळे वय 29 रा. हरताळा ता. मुक्ताईनगर, महेंद्र कडु बंजारी वय 32 रा. रामपेठ वरणगाव ता. भुसावळ, संजय श्रीराम चौधरी वय 49 रा. चिंचोल ता. मुक्ताईनगर, गोपाळ रघुनाथ तायडे वय 45 रा. मानपुर ता. भुसावळ, पदमाकर गोपाळ पाटील वय 37 रा. सुसरी ता.मुसावळ , प्रविण दगडु पाटील वय 35 रा. वढदे ता. मुक्ताईनगर, विकास नारायण चौधरी वय 46 रा. चिंचोल ता. मुक्ताईनगर, मनोहर देवराम पाटील वय 50 रा. विचौल ता. मुक्ताईनगर, अमोल काशिनाथ पाटील वय 36 रा. चिचोल ता. मुक्ताईनगर, वैभव अशोक पाटील वय 30 रा. जुनेगाव मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर, देविदास भिमराव सपकाळे वय 26 रा. मानपुर ता. भुसावळ यांना ताब्यात घेतले व समाधान बाजीराव पाटील वसंत भलभले पुर्ण नाव गाव माहीत नाही हे दोघे पसार झाले.
या प्रकरणी चेतन प्रभाकर निकम वय ३० धंदा-नोकरी ‘पोलीस’ नेमणुक अपर पोलीस अधिक्षक जळगाव अंगरक्षक जळगाव रा.जळगाव यांच्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलीसांत नोंद करण्यात आली आली आहे.
यांनी केली कारवाई
चेतन प्रभाकर निकम यांना दि. २४ रोजी दुपारी ५ वाजता अपर पोलीस अधिक्षक जळगाव वरणगाव पोलीस स्टेशन ला आगामी गणेशोस्तव अनुषंगाने शातंता कमिटीची मिटींग कामी आले असता त्यांनी सपोनि आशिष आडसुळ, पो.उप.निरी. परशुराम दळवी, पोहेकॉ अजय प्रभाकर निकम, चापोना प्रमोद कखरे, पोना अतुल बोदडे, पोकॉ, पराग दुसाने, अपर पोलीस अधिक्षक यांचे पथकातील पोलीस अमलदार पोहेका. अनिल पाटील, पोहेकाँ. रमेश बाबुलाल चौधरी, पोना संदीप भिकन पाटील, पोका अजय शांताराम पाटील, पोकां. नरेद्र युवराज पाटील यांना सदर बाब कळविले होती.